Dental Caps

डेंटल कॅप (Dental Caps)आणि त्यांचे प्रकार | फायदे, वापर आणि किंमत

दातांवरती बऱ्याचदा कॅप (Dental Cap) बसवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून  दिला जातो. मग हि कॅप नक्की काय असते कशासाठी बसवली जाते केव्हा बसवली जातो आणि त्या कॅपचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का असतील तर कोणता चांगला कोणता निवडावा ह्यासाठी अनेक शंका मनात असतात त्यासाठी आज आपण ह्याचीच उत्तरे पाहणार आहोत.  मी डॉ. कश्मिरा जोशी आणि आपण बगूया कॅप आणि कॅप्स चे प्रकार 

डेंटल कॅप (Dental Cap) म्हणजे काय?

तर सगळ्यात पहिले कॅप म्हणजे नक्की काय? कॅप म्हणजे हे एक असा एक प्रकार दातांवरती दाताला कव्हर करण्यासाठी वापरतो ज्याने दातांचा साचा आपण मजबूत करू शकतो कधी कधी असं होत कि दाताला खूप कीड लागलेली असते दाताचा बराच भाग निघून गेलेला असतो तर अशा वेळी दाताला आपल्याला जास्ती मजबूती देणं गरजेचं असत नाहीतर तुकडे पडून दात पूर्णच तुटून जाण्याची शक्यता  असते म्हणून अशा वेळी दाताला कॅप बसवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कधी कधी  दातांचं रूट कॅनॉल केलेलं असत दातांचं रूट कॅनॉल केल्यानंतर बऱ्याचदा दात खूप कोरडा पडतो ड्राय झाला कि तो ब्रूटल असल्यामुळं त्याचे तुकडे पडू शकतात परत रूट कॅनॉल केलेली ट्रीटमेंट तेव्हडी प्रभावी ठरत नाही म्हणून आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट ची कालावधी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट चा चांगला परिणाम  मिळण्यासाठी चांगलं खाता येण्यासाठी रूट कॅनॉल केलेल्या दातांवरती कॅप बसऊन घेणं सुचवलं जात.

अशावेळी जेव्हा आपण हि कॅप करून घेणार असतो त्यातही वेगवेगळे कॅप्स चे प्रकार हि आपल्या कडे आहेत.

कॅप्स चे विविध प्रकार आणि आपण ते कधी बसवू शकतो 

सगळ्यात पहिली म्हणजे 

  1. मेटल ची कॅप किंवा स्टील ची कॅप(metal Crown): हि मेटल ची किंवा स्टील ची कॅप असते ती दिसायला एव्हडी छान नसते पण तिची मजबूती मात्र चांगली असते खूप मजबूत असते टिकाऊ असते. जेव्हा आपण दाताचा मागचा भागाची ट्रीटमेंट करत असतो वरचे मागचे दात जिकडे ते दिसण्याचा फारसा प्रश्न येत नाही तिथे आपण मेटल ची कॅप बसवू शकतो. मेटल ची कॅप बसवण्यासाठी ४०००-५००० रुपये  खर्च येतो 
  1. पोर्सिलीन किंवा सिरॅमिक कॅप(Ceramic Crown):  हि सेरॅमिक ची कॅप आहे त्याच्या आतमध्ये मेटलच्या ठार असतो वाट्याच्या वरती असतो सिरॅमिक चा लेअर थोडक्यात एकावर एक असलेले हे दोन थर असतात. हि कॅप आपण जेव्हा दातावरती बसवतो तेव्हा आपल्याला अर्थातच डबल थिकनेस असल्यामुळे दात जरा जास्तच कमी करावा लागतो ह्याची स्ट्रेंथ हि खूप छान असते तोंडातल्या बऱ्याच जागी आपण हि बसवू शकतो पोर्सिलीन वरून जो सिरॅमिक लेअर येतो तो दाताच्या रंगाची  शेड बऱ्यापैकी आपल्याला सारखा करता येतो आणि हा ब्बऱ्याच ठिकाणी दातांमध्ये वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.  सिरॅमिक कॅप बसवण्यासाठी ६०००-८००० रुपये पर्येंत खर्च येतो. त्याच बरोबर त्याच्या पेक्षा अजून एक सुंदर वरिलेटी म्हणजे झिरकोनिया. 
  1. झिरकोनिया (Zirconia Crown) हि एक सर्वोत्तम व्हरायटी आहे  ज्याच्या मध्ये आपल्याला आतमध्ये एक स्टील लुक देणार कॅप नसतो झिरकोनिया हि पूर्णपणे दाताच्या रंगाची कॅप असते त्याची मजबूती खूप छान असते मागच्या दातांवरती पुढच्या दातांवरती  कुठेही दिसणाऱ्या दातावर न दिसणाऱ्या दातावर आपण हि कॅप बसवू शकतो. झिरकोनिया कॅप बसवण्यासाठी ८०००-१५००० रुपये पर्येंत खर्च येतो.

कॅप बद्दल असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे:

१. कॅप लावल्यानंतर किती वेळाने खाऊ पिऊ शकतो ?

उत्तर – कॅप लावल्यानंतर एक तासपर्येंत काहीच खाऊ नये एक तासानंतर दुसऱ्या बाजूने आपण सर्व काही खाऊ शकतो. कॅपच्या दाताने २४ तासानंतर तुम्ही खायला सुरु करू शकता. कॅप लावलेल्या दातावर आपण सर्व काही खाऊ शकतो फक्त दोन गोष्टी टाळायच्या असतात त्या म्हणजे खूप कडक आणि खूप चिकट पदार्थ कडक म्हणजे खडा नको यायला चणे फुटाणे पोपकोर्न चे दाणे खाताना काळाजी घेतली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट चिकट म्हणजे चिक्की, चॉकलेटे तिळगोळ असे चिकट पदार्थ खाल्याने कॅप निघू शकते.

२. रूट कॅनॉल ट्रीटमेंट केल्यानंतर कॅप बसवणे गरजेचे आहे का?

उत्तर – जेव्हा आपण रूट कॅनॉल करतो तेव्हा आपला दात मुळपर्येंत खराब झालेला असतो ते सगळं आपण साफ केल्यानंतर देखील तो दात खराब झाल्यामुळं कमकुवत झालेला आहे. अशावेळी त्या दातांवरून काही जोरात ताण आला खाताना कडक काहीतरी आलं तर त्या दाताला तुटण्याची शक्यता असते अशावेळी रूट कॅनॉल करून देखील तो दात तुटतो किंवा काढावा लागतो. असं होऊ नये म्हणून दतला कॅप बसवणं गरजेचं आहे.

३. दातांवरती कॅप बसवली कि ती किती वर्षे टिकते?

उत्तर – कॅप व्यवस्थित देखभाल आणि रेगुलर डेंटल चेकअप केलं तर १०-१५ वर्षे कॅप टिकू शकते. 

४. कॅप बसवण्याची प्रक्रिया करताना वेदना होतात का ?

उत्तर – कॅप बसवण्याची पूर्ण प्रकिया भूल देऊन करण्यात येते त्यामुळे पूर्णपणे वेदनारहित ट्रीटमेंट होते. भूल कमी झाल्यानंतर थोडासा सेन्सिटिव्हिटी जाणवते. 

५. डेंटल कॅप दिसायला नैसर्गिक दिसते का?

उ. होय, सिरेमिक आणि झिरकोनिया कॅप्स नैसर्गिक दातांसारख्या दिसतात.

तुम्हालाही कॅप बसवायची असेल किंवा कॅप संबंधित काही माहिती हवी असेल तर मिक्रोडेन्ट डेन्टिस्त्री पुणे (Microdent Dentistry Pune) ला अवश्य भेट द्या.

कॉल करा:  +91 9021681032